क्रीडा

विराट कोहलीबाबत BCCI घेणार मोठा निर्णय? दोन-तीन दिवसांत होणार बैठक

कर्णधार म्हणून विराट कोहली टी-२० वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरला आहे. भारताला सलग दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड कपपूर्वीच कोहलीने टी-२० संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे सांगितले आहे. आता विराट कोहलीकडून वन-डे संघाचे नेतृत्व काढून घेण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सरचिटणीस जय शहा यांनी पुढील दोन-तीन दिवसांत निवड समिती सदस्यांसोबत ऑनलाइन बैठक बोलावली आहे.

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्ड कप होत असून, २०२३चा वन-डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. या वर्षी तरी भारतीय संघाला वन-डे सामने खेळायचे नाहीत. पुढील वर्षीही भारतीय संघाचे फारसे वन-डे सामने नाहीत. पुढील वर्षी जूनपर्यंत भारतीय संघ केवळ तीन वन-डे, तर एकूण १७ टी-२० सामने खेळणार आहे. त्यामुळे कोहलीच्या वन-डेबाबतचा निर्णय आता घ्यावा की नाही, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

पुढील वर्ल्ड कपसाठी अकरा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या संघातील खेळाडूंचा फॉर्म आणि तंदुरुस्ती यावरही चर्चा केली जाणार आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या काही युवा खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. यात सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप मिळविलेला ऋतुराज गायकवाड याचे नाव आघाडीवर आहे. सर्वाधिक विकेट घेणारा आवेश खान, फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल यांना संधी मिळू शकते. जम्मू-काश्मीरच्या उमरान मलिकचेही नाव चर्चेत आहे. अष्टपैलू वेंकटेश अय्यरला पंड्याच्या जागी स्थान मिळू शकते. अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, उमेश यादव यांना पुन्हा संधी मिळू शकते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago