मुंबई

मोठी बातमी! अनिल देशमुख पोहोचले ED कार्यालयात

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे समोर आले आहेत. देशमुख थेट सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) कार्यालयात पोहोचले आहेत.

अनिल देशमुख हे सध्या मनी लॉण्ड्रिंग व खंडणी वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्याशिवाय, त्यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचाही आरोप होता. यापूर्वी देशमुख यांना चौकशीला हजर राहण्यासाठी अनेकदा समन्स बजावण्यात आले होते. पण ते ईडीसमोर हजर झाले नव्हते. ईडीच्या अधिकाऱ्यांना शोध घेऊनही ते सापडत नव्हते. अखेर आज अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत.

ईडीच्या कार्यालयात हजर होण्यापूर्वी अनिल देशमुख यांनी एक व्हिडिओ ट्वीट करत म्हटलं आहे कि, “ईडीचं पहिलं समन्स आल्यापासून अनिल देशमुख हे ईडीला सहकार्य करत नसल्याचे आरोप होत होते. मात्र, ते खरं नाही. ज्या-ज्या वेळी मला समन्स आलं, त्यावेळी मी ईडीला उत्तर पाठवलं होतं. माझी याचिका उच्च न्यायालयात आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायलयातही मी याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वत: ईडीच्या कार्यालयात येईन, असं मी ईडीला कळवलं होतं. ज्या ज्या वेळी ईडीनं माझ्या घरांवर छापे टाकले, त्यावेळी माझ्या कुटुंबीयांनी, कर्मचाऱ्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केलं. मी स्वत: सीबीआयच्या कार्यालयात दोनदा हजर राहून माझं म्हणणं मांडलं. अजूनही माझी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पण आज मी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर राहिलोय.”

देशमुख म्हणाले कि, ‘परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहेत? आरोप करणारेच पळून गेलेत. आज परमबीर यांच्या विरोधात पोलीस खात्यातीलच लोकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.’

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago