Social Media Influencer Faisal Shaikh Detained By Mumbai Police
मुंबई : सोशल मीडिया स्टार फैजल शेख उर्फ फैजू याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. भरधाव कार चालवून अपघात केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
जवळपास अडीच कोटींच्या घरात फॉलोअर्स असलेल्या फैजू याची कार एका सोसायटीच्या प्रवेशद्वाराला धडकून अपघात झाला आहे. फैजल हा त्याच्या काही सहकाऱ्यांसोबत ओशिवरातल्या मिलत नगर भागात कारने आला होता. भरधाव कारवरचा ताबा सुटून ती गेटला धडकली आणि त्यानंतर ती सोसायटीत घुसली. ओशिवराच्या मिलत नगर परिसरात हा प्रकार घडला. यानंतर मोठा गोंधळ उडाला. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, संबंधित सोसायटीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…