राजकारण

राज्यसभेत प्रचंड गदारोळादरम्यानच कृषी विधेयक झाले मंजूर

नवी दिल्ली:  कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक ही तीन विधेयकं लोकसभेत मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर ही विधेयकं राज्यसभेत मांडण्यात आली ज्यावरुन मोठा गदारोळ पाहायला मिळाला. त्यामुळे या गदारोळातच राज्यसभेत हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले आहे.

दरम्यान, सभागृहातील गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज हे उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. विधेयकाला विरोध करताना विरोधी पक्षांच्या नेत्यांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. कॉंग्रेसचे खासदार टी.एन प्रथपन यांनी कृषी विधेयक हे देशभरातील शेतकर्‍यांच्या विरोधी असल्याचे सांगत लोकसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली.

तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांना सभागृहाचे नियम पुस्तिका दाखवली आणि त्यानंतर त्याच्या समोर जाऊन ती फाडली देखील तर अनेक खासदारांनी आपल्या समोर असणारे माईकदेखील तोडून टाकले. तसंच उपसभापतींसमोर असणारे माईक देखील तोडण्यात आले त्यामुळे सभागृहातील गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज हे उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे

तोमर म्हणाले की, ‘दोन्ही विधेयके ऐतिहासिक आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडतील. या विधेयकांच्या तरतुदीनुसार शेतकरी कोठेही आपली पिके विकू शकतील व त्यांना इच्छित भावाने आपला माल विकण्याचे स्वातंत्र्य असेल. तसेच शेतकऱ्यांना संरक्षण देण्याच्या तरतुदीही करण्यात आल्या आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago