महाराष्ट्र

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : मुंबई-पुण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाचे कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहेत. या महापालिकांसाठी मतदान 15 जानेवारी रोजी होणार असून निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. यासाठी आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील 29 महापालिकांमध्ये एकूण 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करतील, तर एकूण मतदार केंद्रांची संख्या 39,147 आहे. मुंबईसाठी 10,111 मतदार केंद्रे, कंट्रोल युनिट 11,349 आणि बॅलेट युनिट 22,000 ठरवण्यात आले आहेत.

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या 5-7 वर्षांपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या महापालिकांच्या निवडणुकीस मार्ग मोकळा झाला. सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या, आणि आता प्रलंबित 29 महापालिकांसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे.

महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक

  • नामनिर्देशन पत्र स्वीकारणे – 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
  • अर्जाची छाननी – 31 डिसेंबर
  • उमेदवारी माघारीची मुदत – 2 जानेवारी
  • चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी – 3 जानेवारी
  • मतदान – 15 जानेवारी
  • निकाल – 16 जानेवारी

राज्यातील 27 महापालिका निवडणुकीसाठी मुदत संपली आहे. यासोबत जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांमध्येही निवडणूक होणार आहे. या महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदान यादी ग्राह्य धरली जाईल.

निवडणूक खर्चाची मर्यादा
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांचा खर्च आयोगाने ठरवलेला आहे:

  • अ वर्ग – 15 लाख
  • ब वर्ग – 13 लाख
  • क वर्ग – 11 लाख
  • ड वर्ग – 9 लाख

मुंबई महापालिकेमध्ये एक सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे मतदारांना एकच मत द्यावे लागणार आहे, तर उर्वरित 28 महापालिकांमध्ये 1 ते 5 सदस्यीय वॉर्ड असल्याने त्यानुसार मतदान होईल.

उमेदवारीसाठी नियम

  • उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावा लागेल.
  • सध्याच्या जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांनी निवडणुकीपासून सहा महिन्यांच्या आत सादर करणे आवश्यक आहे.

मतदार जनजागृतीसाठी रील तयार केल्या गेल्या आहेत. जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा, रँप आणि व्हीलचेअर उपलब्ध राहतील.

राज्यातील 1,96,605 कर्मचारी या निवडणुकीसाठी काम करतील. मतदानापूर्वी 48 तास प्रचारावर बंदी असेल, तसेच त्या कालावधीत जाहिरातींवरही बंदी राहील.

महिला व आरक्षित वर्गासाठी जागा
राज्यातील 29 महापालिकांमध्ये एकूण 2,869 जागांसाठी मतदान होणार आहे:

  • महिला सदस्य – 1,442
  • इतर मागासवर्गीय सदस्य – 759
  • अनुसूचित जाती सदस्य – 341
  • अनुसूचित जमाती सदस्य – 77

दुबार मतदार
मुंबईत 11 लाख संभाव्य दुबार मतदार आहेत, जे एकूण मतदारांचा सुमारे 7% आहे. यांचा शोध घेऊन त्यांच्यासाठी नावासमोर दोन स्टार चिन्ह ठेवण्यात आले आहे. ज्यांच्यावर सर्वेक्षण झाले नाही, त्यांच्याकडून मतदान केंद्रावर हमीपत्र घेण्यात येईल.

निवडणूक होणाऱ्या महापालिका

  1. बृहन्मुंबई – 227
  2. पुणे – 162
  3. भिवंडी-निजामपूर – 90
  4. नागपूर – 151
  5. ठाणे – 131
  6. अहिल्यानगर – 68
  7. नाशिक – 122
  8. पिंपरी-चिंचवड – 128
  9. छत्रपती संभाजीनगर – 113
  10. वसई-विरार – 115
  11. कल्याण-डोंबिवली – 122
  12. नवी मुंबई – 111
  13. अकोला – 80
  14. अमरावती – 87
  15. लातूर – 70
  16. नांदेड-वाघाळा – 81
  17. मीरा-भाईंदर – 96
  18. उल्हासनगर – 78
  19. चंद्रपूर – 66
  20. धुळे – 74
  21. जळगाव – 75
  22. मालेगाव – 84
  23. कोल्हापूर – 92
  24. सांगली-मिरज-कुपवाड – 78
  25. सोलापूर – 113
  26. इचलकरंजी – 76
  27. जालना – 65
  28. पनवेल – 78
  29. परभणी – 65
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago