देश

मस्तच ! आता विमा पॉलिसी डिजिटल लॉकरमध्ये ठेवता येणार.. जाणून घ्या..

नवी दिल्ली : आपल्या विमा पॉलिसीची कागदपत्रे सुरक्षित करण्यासाठी लवकरच आपण सरकारी डिजीलॉकर वापर करू शकणार आहोत. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने निर्देश दिले आहेत कि, विमा कंपन्यांनी रिटेल पॉलिसीधारकांना डिजीलॉकर सुविधेविषयी तसेच ते कसे वापरावे याबद्दल सांगावे. विमा कंपनीने पॉलिसीधारकांना त्या प्रक्रियेबद्दलही माहिती द्यावी, ज्याद्वारे पॉलिसीधारक आपली पॉलिसी डिजीलॉकरमध्ये ठेवू शकतात.

डिजीलॉकरमध्ये नागरिक त्यांच्या सर्व कागदपत्रांच्या प्रती त्यांच्या मोबाइल फोनमध्ये सुरक्षितपणे जतन करू शकतात किंवा ‘डिजिटल लॉकर अ‍ॅप’ घेऊ शकतात. हे अ‍ॅप गूगल किंवा Apple प्ले अ‍ॅप स्टोअर वरून सहज डाऊनलोड करता येईल.

सध्या ड्रायव्हिंग लायसन्स, कार नोंदणी, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, शाळा व महाविद्यालयाचे प्रमाणपत्र व सरकारने जारी केलेली इतरही अनेक कागदपत्रे डिजिटल स्वरुपात जतन केली जाऊ शकतात. सरकारच्या डिजीलॉकर उपक्रमांतर्गत नागरिक त्यांचे मूळ प्रमाणपत्र/अस्सल कागदपत्रे /प्रमाणपत्रे जारीकर्त्यांकडून डिजिटल स्वरूपात घेऊ शकतात. भौतिक कागदपत्रांचा वापर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ही सुविधा सुरू केली आहे.

आयआरडीएआय (IRDAI) ने परिपत्रकात म्हटले आहे की विमा क्षेत्रातील डिजीलॉकर सुविधेमुळे खर्च कमी होईल आणि ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्यात मदत होईल. आयआरडीएआयने असेही म्हटले आहे की इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत नॅशनल ई-गव्हर्नन्स विभागातील डिजीलॉकर टीम डिजीलॉकरचा वापर करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सहाय्य करेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago