महाराष्ट्र

गोल्डमॅन सचिन शिंदे खून प्रकरणात तिघांना पोलिसांकडून अटक..

पुणे : लोणीकंद येथील गोल्डमॅन सचिन शिंदे खून प्रकरणी ४८ तासात तीन जणांना लोणीकंद पोलिसांचे गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. लोणीकंद पोलीसांनी या प्रकरणी सचिन किसन शिंदे (वय ३२), प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 20), रोशनकुमार शमशेर साहू उर्फ गौंड (वय 20) यांना आज अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद येथे मंगळवारी (ता.९) रोजी दुपारी ११.५० च्या सुमारास एचडीएफसीच्या एटीएम समोर सचिन नानासाहेब शिंदे सहकाऱ्यांबरोबर गप्पा मारत होता. अचानक एका अज्ञात व्यक्तीने पिस्तुलाने सचिन नानासाहेब शिंदे याच्या पाठीमागून येऊन त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस गोळीबार केला. भगव्या रंगाच्या स्कूटर चालविणाऱ्या साथीदाराच्या पाठीमागे बसून नगर रोडने पेरणे गावाच्या दिशेने पलायन केले. यात सचिन शिंदे याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला.

गोल्डमॅन अशी ओळख असलेला सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून…

पोलीस खात्याने या घटनेची गांभीर्याने दखल घेत लोणीकंद गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या पथकांनी संयुक्त तपास करीत या खून प्रकरणात सचिन किसन शिंदे (वय ३२), प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 20), रोशनकुमार शमशेर साहू उर्फ गौंड (वय 20) या तिघांना अटक केली आहे.. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे. हा गुन्हा त्यांनी आणखी साथीदारांचे मदतीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस पुढील  तपास करत आहेत..

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

18 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago