pune Gold Man Sachin Shinde Shot Dead
पुणे: पुणे- अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद येथे सचिन नाना शिंदे नामक गुन्हेगारावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये त्या गुन्हेगाराचा मृत्यू झाला असून याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणीकंद भागात सचिन (वय २९, रा. लोणीकंद) हा गोल्डमॅन म्हणून ओळखला जायचा. त्याच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन शिंदे हा पुणे ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह इतर गुन्हे दाखल आहेत. तो काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. मंगळवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास तो लोणीकंद येथील अक्सिस बँकेजवळ उभा होता. त्यावेळी अक्टिव्हावरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने शिंदेवर गोळी झाडली. एक गोळी शिंदे याच्या मानेजवळ लागली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने आरोपींचा शोध सुरू केला आहे. गोळीबार पूर्ववैमनस्यातून करण्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…