महाराष्ट्र

आनंदाची बातमी : तात्काळ मदतीसाठी पोलिस इर्मजन्सी सर्व्हिस ही नवी यंत्रणा.. १०० नंबर कालबाह्य…

पुणे :  राज्यात ‘पोलिस इर्मजन्सी सर्व्हिस’ची नवीन यंत्रणा उभी करण्याची घोषणा गेल्या वर्षी गृहमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार राज्यात सध्या पोलिसांना एखाद्या घटनेबाबत माहिती कळविण्यासाठी ‘१००’ नंबरवर कॉल केला जातो. मात्र, नवीन यंत्रणेनुसार लवकरच ‘१००’ नंबर कालबाह्य होणार असून, ‘११२’ हा नंबर कार्यान्वित केला जाणार आहे. यामध्ये केवळ नियंत्रण कक्षाचा नंबरच बदलणार नसून, त्यानंतर पोलिसांकडून केली जाणारी कार्यवाहीदेखील पूर्णत: बदलणार आहे.

सध्या पोलिस नियंत्रण कक्षाला एखादी घटना कळवल्यानंतर, तेथून संबंधित पोलिस ठाण्याला माहिती दिली जाते. त्यानंतर तेथून ‘मार्शल’ घटनास्थळी जातात. नवीन योजनेनुसार सर्व पोलिस ठाण्यांतील ‘मार्शल’ कर्मचारी नियंत्रण कक्षाशी ‘जीपीएस’मार्फत जोडलेले असणार आहेत. एखादी घटना घडल्यानंतर नियंत्रण कक्षातूनच त्या घटनास्थळापासून जवळ असलेल्या ‘मार्शल’ कर्मचाऱ्यांस थेट माहिती कळवली जाईल. यासाठी ‘मार्शल’ कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक ‘टॅबलेट’ दिला जाणार आहे. त्या ‘टॅब’द्वारेच पुढील सर्व व्यवहार पार पाडले जाणार आहेत.

नवीन पोलिस इमर्जन्सी सर्व्हिससाठी राज्यभरातील पोलिस ठाण्यांसाठी एक हजार ५०० कार आणि दोन हजार २०० दुचाकी वाहने खरेदी करण्यात येत आहेत. यातील काही वाहने पुण्यात दाखल झाली आहेत. या सेवेअंतर्गत कारमध्ये मोठा ‘टॅब’ आणि दुचाकीवरील मार्शल कर्मचाऱ्याकडे छोटा ‘टॅब’ दिला जाणार आहे.

जुनी कार्यपद्धती :

  1. नागरिक १०० क्रमांकावर फोन करून मदतीची मागणी किंवा एखाद्या घटनेची माहिती देतात.
  2. मिळालेल्या माहितीनुसार नियंत्रण कक्षातून संबधित पोलिस ठाण्यातील मार्शलला सूचना दिली जाते.
  3. मार्शल माहिती कळविणाऱ्यास फोन करून त्या ठिकाणी पोचतात.

नवीन कार्यपद्धती :

  1. नियंत्रण कक्षाच्या ११२ हेल्पलाइनवर फोन करून घटनेची माहिती अथवा मदतीची मागणी करतील.
  2. नियंत्रण कक्षातून त्या संबंधित ठिकाणापासून जवळ असलेल्या मार्शलचा ‘जीपीएस’मार्फत शोध घेतला जाईल.
  3. जवळच्या मार्शलला ‘ती’ वर्दी कळवण्यात येईल. पोलिस ठाण्याच्या हद्दीचा मुद्दा गौण.
  4. पीडित व्यक्ती, तक्रारदार यांचा जबाब (व्हिडिओ) ‘टॅब’मध्ये रेकॉर्ड करणे शक्य.

या नवीन गोष्ट सामान्य नागरिकांसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago