देश

संतापजनक : मुलीची छेड काढणाऱ्यांना विरोध केल्यामुळे महिलेची गोळ्या घालून हत्या

मुलीची छेड काढणाऱ्यांना विरोध केल्यामुळे महिलेला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. बिहारची राजधानी पाटणा येथे फतुहा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आशादेवी लल्लन यादव असे या मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणातील तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी ललन यादवच्या अल्पवयीन मुलीची शेजारीच राहणाऱ्या चंदन कुमार या मुलाने छेड काढली, या प्रकरणात दोन्ही शेजार्‍यांमध्ये मोठे भांडण झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच विषयावरून दोन्ही शेजार्‍यांमध्ये भांडण झाले. गावात उलटसुलट चर्चा होऊ नये म्हणून लल्लन यादवच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली नाही. बुधवारी सकाळी काहीजणांनी लल्लन यादव यांच्या घरावर हल्ला चढवला आणि गोळीबार केला. यामध्ये लल्लनची पत्नी आशादेवीचा गोळ्या लागून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यातही घेतले आहे, मुख्य आरोपी चंदन कुमार फरार असून त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago