baby
हिमाचल प्रदेश : एका महिलेने आपल्या नवजात बाळाला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर बेवारस अवस्थेत सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या सरकारी निवासस्थानाजवळ हे नवजात बाळ सुरक्षा रक्षकांना आढळलं. त्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर काही तासांतच हे बाळ एका अविवाहीत महिलेचं असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी महिलेने कमला नेहरू रुग्णालयाजवळ (KNH) आपल्या नवजात बाळाला बेवारस अवस्थेत सोडून दिलं होतं. हे ठिकाण मुख्यमंत्री निवासस्थानाच्या जवळ असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या काही सुरक्षारक्षकांनी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बाळाला ताब्यात घेत उपचारासाठी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. बाळाची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतर रस्त्यावर सापडलेल्या रक्ताच्या ठशांवरून पोलीस या महिलेपर्यंत पोहचले आणि पोलिसांनी तिच्या घरी जाऊन तिला ताब्यात घेतले.
चौकशी अधिकारी रंजना शर्मा यांनी सांगितले की संबंधित महिलेला केएनएच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर तिला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या महिलेविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३१७ (१२ वर्षांहून कमी वयाच्या बाळाचा परित्याग करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…