ठाणे

महिलेला एकाच वेळी दिले कोरोना लसीचे तीन डोस

ठाणे : एका २८ वर्षीय महिलेला एकाच वेळी कोरोना लसीचे तीन डोस दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे महापालिकेच्या घोडबंदर रोड परिसरातील आनंदनगर आरोग्य केंद्रामध्ये २५ जून रोजी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या महिलेची प्रकृती स्थिर असली, तरी तिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. महापौरांनी या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर आरोग्य केंद्रामध्ये रूपाली साळी लसीची पहिली मात्रा घेण्यासाठी गेल्या होत्या. पहिली लसमात्रा घेतल्यानंतर त्यांना काही मिनिटांच्या अंतराने आणखी दोन वेळा लस टोचण्यात आली. लसीकरण केंद्रातून बाहेर आल्यानंतर त्यांनी ही बाब त्यांच्या पतीला सांगितली. परंतु, प्रकृती बरी असल्याने त्यांनी कोणाला काही सांगितले नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांनी ही घटना स्थानिक नगरसेविका कविता पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणांनी या महिलेच्या प्रकृतीची तपासणी केली. या महिलेचा पती महापालिकेचा कर्मचारी आहे. त्यांनी यासंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचे सांगितले आहे. परंतु, या प्रकरणाची दखल घेत महापौर नरेश म्हस्के यांनी चौकशी समिती नेमण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

सोमवारी भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी यासंदर्भात आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन त्यांना दोषींवर कारवाई करण्याची विनंती केली. निष्काळजीमुळे हा प्रकार घडला असून, याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तीनदा लसीकरण झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु, यासंदर्भात आणखी सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago