देश

पंजाबमध्ये सहा वर्षाच्या बालिकेला बलात्कारानंतर जाळण्याच्या घटनेवर कॉंग्रेस शांत का?- निर्मला सीतारमण

पंजाबमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्या शांततेवर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या घटनेबद्दल राज्य सरकारला घेरणाऱ्या कॉंग्रेसला भाजपने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी पंजाबमधील होशियारपूरमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर केलेल्या अमानुषतेचा निषेध केला आणि म्हटले की या जघन्य घटनेबद्दल कॉंग्रेसचे मौन खेदजनक आहे.

सीतारमण यांनी घटनेवरून आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनाही लक्ष्य केले. त्या म्हणाल्या की, तेजस्वी यादव बिहारच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवर प्रश्न न विचारता प्रचारात व्यस्त आहेत. राजस्थानसारख्या कॉंग्रेस शासित राज्यांमध्ये घडलेली बलात्काराची प्रकरणं राहुल गांधी यांना दिसत नाहीत. हाथरस प्रकरणात मात्र सर्व कॉंग्रेस नेते प्रदर्शन सुरू करतात. सीतारमण म्हणाल्या कि महिला सुरक्षेच्या गंभीर विषयावर राजकारण करून कॉंग्रेस आपल्या अस्तित्वाचा शोध घेत आहे, हे दुःखद आहे.

सीतारमण यांनी सांगितले की, पंजाबच्या होशियारपूर येथे बिहार प्रवासी मजूराच्या मुलीवर अत्याचार झाला. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी होशियारपूर आणि राजस्थानमधील घटनांबाबत हाथरस प्रकरणात दाखवला तसा सक्रियपणा का दाखविला नाही? प्रत्येक विषयावर ट्वीट करणारे राहुल गांधी यांनी ना ट्वीट केले ना ते पिकनिकला गेले. कॉंग्रेस पक्षाची प्रमुख स्वत: एक महिला आहे. अशा प्रकारे निवडक घटनांवर प्रतिक्रिया देणं कॉंग्रेसला शोभतं का?

निर्मला सीतारामन म्हणाल्या कि, पीडित कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि वेळीच न्याय मिळावा यासाठी भाजप संघर्ष करेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago