शैक्षणिक

UPSC Prelims 2020 Result : यूपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगानं (यूपीएससी) सिव्हील सर्व्हिसेस पूर्व परीक्षा 2020 चा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेनंतर अवघ्या 19 दिवसात निकालाची घोषणा यूपीएससीनं केली आहे. विद्यार्थी हा निकाल ऑफिशियल वेबसाईट upsc.gov.in किंवा upsconline.nic.in वर जाऊन पाहू शकतात. आयोगाने यूपीएससी सीएस पूर्व परीक्षा 2020 परीक्षेसह भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2020 चा देखील निकाल जाहीर केला आहे.

परीक्षा नियमांनुसार जे विद्यार्थी या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेत त्यांचा निकाल घोषित केला आहे. आता या विद्यार्थ्यांना यूपीएससी सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा 2020 साठी विस्तृत फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थी हा फॉर्म यूपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईट वर 28 ऑक्टोबर 2020 ते 11 नोव्हेंबर 2020 दरम्यान सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत भरु शकतील. या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. यूपीएससी सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा 2020 साठी अॅडमिट कार्ड आणि परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या आधी 3-4 आठवडे येण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांनी जर आपला पत्ता, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी बदलला असेल तर तशी माहिती आयोगाकडे देणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेची अन्सर की, मार्क्स आणि कट ऑफ़ मार्क्स याची पूर्ण माहिती यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा 2020 चा अंतिम निकाल लागल्यानंतर देणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

17 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago