महाराष्ट्र

महाबळेश्वरहून निघालेल्या दांपत्याची कार दरीत कोसळून अपघात

वाई : महाबळेश्वरहून मुंबईला जात असताना पाचगणी-वाई रस्त्यावर पसरणी घाटात सकाळी पर्यटकांची कार सहाशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात एक महिला ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले.

मुंब्रा येथील दांपत्य कारने (MH 02 EH 1208) मुंबईकडे जात असताना पाचगणी-वाई रस्त्यावर पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने संरक्षक कठडा तोडून गाडी ६०० फूट खोल दरीत कोसळली .अपघातात नेहा मोहम्मद चौधरी (वय २२) ही महिला जागीच ठार झाली. मोहम्मद इर्शाद चौधरी व सिराज हमीद शेख (चालक) गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहाय्यक निरीक्षक आशिष कांबळे, उपनिरीक्षक राजेंद्र कदम आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महाबळेश्वर ट्रेकर्स व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले. गाडी खोल दरीत कोसळल्यामुळे गाडीजवळ पोहोचण्यास फार शिकस्त करावी लागली. अपघातामुळे पसरणी घाटात वाहतूक ठप्प झाली होती. जखमींना वाई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago