देश

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा, 27 सप्टेंबर 2020

आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात…

  1. कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर; विधेयकांचे कायद्यात रुपांतर – घटनांची या विधेयकांविरोधात आंदोलनं सुरु असतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकांना आपल्या सहीसह मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या तिन्ही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले आहे.
  2. अदर पूनावाला यांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक.. – भारताच्या लशीचं उत्पादन आणि लशीच्या वितरणाची क्षमता संपूर्ण मानवतेला संकटातून बाहेर काढण्याच्या कामी येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत म्हटलं होतं. यावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत
  3. हार्ले डेविडसन कंपनीचा भारतातील उत्पादन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय – अमेरिकेच्या हार्ले डेविडसन या मोटारसायकलची निर्मिती करणाऱ्या कंपनीने भारतातील उत्पादन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने मागील वर्षी ग्लोबल री-स्ट्रक्चरिंग इनिशिएटिव्हची घोषणा केली होती. त्याअंतर्गत ज्या देशात कंपनीची विक्री आणि फायदा कमी आहे, त्या देशांमधील व्यवसाय बंद करायचा होता.
  4. शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहण्याची मोठी भूक लागली – संजय निरुपम – संजय निरुपम आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ” असे वाटतेय की शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहण्याची मोठी भूक लागली आहे
  5. थिएटर्स उघडणार, ममता बॅनर्जींचा निर्णय – पश्चिम बंगालमध्ये एक ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे

दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर थोडक्यात घडामोडीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर..

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago