देश

उत्तराखंड हिमनदी दुर्घटना : जवळपास १३ गावांचा संपर्क अजूनही तुटलेला, हेलिकॉप्टरमधून पुरवणार अन्न-धान्याची पाकिटं

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील तपोवन भागात हिमनदी फुटल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून १५० पेक्षा जास्त जण अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय हवाईदलाकडून मदत पुरवण्यात येत आहे. जवळपास १३ गावांचा संपर्क अजूनही तुटलेला असल्याचं समोर आलं आहे. जिल्हा प्रशासनाकडून या भागात हेलिकॉप्टरच्या मदतीनं अन्न-धान्याची पाकिटं नागरिकांना पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एनडीआरएफ आणि भारतीय हवाईदलाला संयुक्तपणे बचावकार्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर भारतीय हवाईदलाकडून तीन हेलिकॉप्टर मदतीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामध्ये दोन ‘एमआय १७’ आणि एका ‘एएलएच ध्रव’ या हेलिकॉप्टरचा समावेश आहे. रविवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशनसाठी भारतीय हवाईदलाकडून हे तिनही हेलिकॉप्टर ‘डिझास्टर रिलीफ टीम’सोबत देहरादूनहून जोशीमठासाठी रवाना झाले आहेत.

भारतीय हवाईदलाकडून गरज पडल्यास आणखी विमानांना मदतीसाठी तैनात करण्यात येईल. हवाईदलाच्या सी १३० आणि AN ३२ या एअरक्राफ्टच्या मदतीनं जॉली ग्रान्ट विमानतळाहून एनडीआरएफ कर्मचाऱ्यांना एअरलिफ्ट करण्यात आलं. भारतीय हवाईदलाकडून रविवारी सायंकाळी हिंडनहून सी १३० द्वारे ६० जवानांसहीत पाच टन भार एअरलिफ्ट करण्यात आला. तर जॉली ग्रँटवर तीन Mi -17 देखील तैनात करण्यात आले आहेत.

बचावकार्यासाठी भारतीय लष्कर, एसडीआरएफ, आयटीबीपी आणि भारतीय वायुसेनेसहीत इतरही सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलीय. रविवारी हिमनदी फुटल्याचं समजताच आयटीबीपी, एनडीआरएफ आणि एडीआरएफची टीम बचावकार्यात सक्रीय झाली होती. तर हवाईदलाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

आयएएफने दिलेल्या नुकसानीच्या अहवालानुसार, धौली गंगा आणि ऋषी गंगा यांच्या संगमावरील तपोवन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर धरण संपूर्णपणे नष्ट झाले आहे. मलेरी खोऱ्याच्या सुरूवातीला बांधलेले दोन पूलही नष्ट झाले आहेत. जोशीमठ आणि तपोवन यांना जोडणारा मुख्य रस्ता सुरक्षित आहे. तपोवनमधील बर्‍याच भागात प्रचंड नुकसान झालं आहे. पिपलकोटी, चमोली तसेच धौली गंगा आणि अलकनंदा हे भाग देखील प्रभावित झाले आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago