महाराष्ट्र

कार्यालयात काम सोडून केस विंचरत बसणे हे गंभीर गैरवर्तन – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : कार्यालयात काम सोडून केस विंचरत बसणे हे गंभीर गैरवर्तन आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले. बॉसवर हल्ला करणाऱ्या गिरणी कामगाराला कारवाईपासून कोणताही दिलासा देण्यास नकार देत न्यायालयाने ही टिप्पणी केली. रंगराव चौधरी नावाच्या व्यक्तीने कामगार न्यायालयाच्या मे 1995 मधील आदेशाला आव्हान दिले होते. त्याची याचिका न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.

कंपनीने रंगरावविरोधात बॉसवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच त्याला कामावरून काढून टाकले होते. या प्रकरणात कामगार न्यायालयाने रंगरावची फौजदारी खटल्यातून निर्दोष सुटका केली होती. मात्र तो पुन्हा कार्यालयात रुजू होऊ शकला नाही. याकडे रंगरावने उच्च न्यायालयाचे लक्ष वेधले होते. मात्र न्यायालयाने त्याचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला.

काय आहे प्रकरण :

अर्जदार रंगराव चौधरी मे 1995 मध्ये नाईट ड्युटीवर होता. त्यावेळी तो मशिनीवरील काम सोडून केस विंचरत बसला होता. वरिष्ठांना हे दिसताच त्यांनी त्याला झापले. त्यामुळे रागाच्या भरात रंगरावने बॉसला लोखंडी रॉड फेकून मारला. त्यात बॉसला गंभीर दुखापत झाली होती. तसेच रंगरावने शिवीगाळही केली होती. यामुळे रंगरावला कामावरून काढून टाकण्यात आले. या कारवाईला रंगरावने कामगार न्यायालयात आव्हान दिले होती. तेथे दिलासा मिळाला नाही म्हणून रंगरावने उच्च न्यायालयात धाव घेतली.

मशिनीवरील काम सोडून केस विंचरत बसणे हे गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन आहे. याचिकाकर्त्या रंगरावचे कृत्य मनमानी वाटते. वरिष्ठांनी ताकिद दिल्यानंतर रंगराव मशिनवर पुन्हा काम करायला यायचं तर त्याने बॉसलाच शिवीगाळ केली आणि नंतर रॉडने हल्ला केला. हे अत्यंत गंभीर गैरवर्तन आहे, असे न्यायमूर्ती विनय देशपांडे म्हणाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago