शैक्षणिक

CBSE Board Exam Form २०२१ : बोर्डाने दिली परीक्षा फॉर्म भरण्याची तसेच दुरुस्तीची आणखी एक संधी

CBSE Board Exam Form २०२१ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्रासाठी २०२०-२१ घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी ऍप्लिकेशन विंडो पुन्हा उघडण्यात आली आहे. CBSE बोर्ड परीक्षा फॉर्म 2021 संदर्भात शनिवारी 6 फेब्रुवारी 2021 रोजी यासंबंधी सूचना जारी करण्यात आली.

जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, माध्यमिक व उच्य माध्यमिक वर्गातील असे सर्व विद्यार्थी जे काही कारणास्तव CBSE बोर्ड दहावी किंवा 12 वी परीक्षा २०२१ फॉर्म भरू शकले नाहीत, ते आता 13 फेब्रुवारीपर्यंत परीक्षेचे फॉर्म भरू शकतील. त्यासोबतच, मंडळाने शाळांना देखील 13 फेब्रुवारीपर्यंत राहिलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी एलओसी सबमिट करण्याची आणखी एक संधी दिली आहे. याशिवाय मंडळाकडून नव्याने संलग्न शाळांमधील विद्यार्थ्यांनाही परीक्षेचा फॉर्म भरण्याची संधी देण्यात आली आहे.

उर्वरित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फॉर्म भरण्याच्या संधीबरोबरच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फॉर्म भरण्यात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आलेल्या असतील किंवा ज्यांना परीक्षा फॉर्ममध्ये दुरुस्ती करायची असेल, त्यांना मंडळाने आणखी एक संधी दिली आहे. CBSE बोर्ड परीक्षा फॉर्म 2021 मध्ये दुरुस्ती, तसेच शाळांनी आधीच भरलेल्या एलओसीमध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी निश्चित केली आहे.

CBSE बोर्डाने नोटीस जारी करून, दिलेल्या नवीन तारखेपर्यंत शाळांना परीक्षा फॉर्म भरण्याचे व आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याचे निर्देश दिले आहेत, कारण यानंतर पुन्हा संधी मिळणार नाही. फॉर्म भरणे आणि दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सीबीएसई बोर्ड प्रवेश पत्र 2021 लवकरच दिले जाऊ शकते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago