महाराष्ट्र

बारावी परीक्षेची ऑनलाईन आवेदन पत्रे भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या फेब्रुवारी -मार्च २०२६ च्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे भरावयाच्या तारखेस (नियमित शुल्क) २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना मुदतीत अर्ज भरण्यास अडचण निर्माण होऊ शकते, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निर्देश दिले होते. त्यानुसार मंत्री दादाजी भुसे यांनी राज्य मंडळास केलेल्या सूचनेनुसार मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या फेब्रु-मार्च २०२६ च्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.

व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन परिक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन भरावयाच्या तारखेस (नियमित शुल्क) २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे फेब्रुवारी -मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) स्वीकारण्याच्या तारखांना देखील १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नवीन परीक्षा केंद्र मान्यतेचे प्रस्ताव स्वीकारण्यास १० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या दहावी व बारावी परीक्षेसाठी नवीन परीक्षा केंद्र मान्यतेचे प्रस्ताव ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत स्वीकारण्यात यावेत, असे कळविण्यात आले होते. सदर नवीन परीक्षा केंद्रासंदर्भातील मान्यतेचे प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात येत असून असे प्रस्ताव १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत स्वीकारण्यात यावेत, असे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago