अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील ४४ नागरिकांची एनडीआरएफ कडून यशस्वी सुटका

अहिल्यानगर : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीचा तातडीने सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पुणे येथील पथकास कर्जत तालुक्यातील मलठण खताळ वस्ती परिसरात तैनात करण्यात आले होते. या पथकाने आज राबविलेल्या मोहिमेत पुरात अडकलेल्या ४४ नागरिकांची सुरक्षित सुटका केली.

कमांडंट संतोष बहादूर सिंह यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने परिसरात पाणी व चिखलमय स्थिती तसेच ऊसशेतीमुळे बोटसह बोटीवरील बाह्य इंजिन वापरणे अशक्य असल्याने दोरीच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. या कारवाईत सर्व नागरिकांची सुरक्षिततेने सुटका करण्यात आली.

स्थानिक प्रशासन, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA), भारतीय हवामान विभाग (IMD) व धरण प्राधिकरणाशी समन्वय साधून NDRF पुणे पथक सातत्याने कार्यरत आहे. नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी व आपत्ती व्यवस्थापनासाठी पुणे तुकडी सदैव सज्ज असल्याचे एनडीआरएफ कडून कळविण्यात आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago