देश

विहिरीत पडून १३ जणांचा मृत्यू, महिलांना ‘तिथे’ जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता, पण…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील नेबुवा नौरंगिया येथे रात्री उशिरा झालेल्या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गावातील एका घरात लग्न समारंभ सुरू असताना विहिरीवरील स्लॅब कोसळून त्यावर उभे असलेले अनेक जण विहिरीत कोसळले व या दुर्दैवी अपघातात १३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून महिलांना धक्का बसला आहे. दरम्यान, स्लॅब तुटण्याची शक्यता व्यक्त करत महिलांना तिथे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असे कुटुंबातील काही महिलांनी सांगितले आहे.

ही घटना एवढी भीषण होती की संपूर्ण गावात खळबळ उडाली. लग्नघरात एकच गोंधळ उडाला. गावातून जिल्हा रुग्णालयापर्यंत आक्रोश सुरु होता. आयुक्त, डीआयजी, डीएम, एसपी घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्याची माहिती घेतली. तसेच त्यांनी पीडितांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नौरंगिया गावातील रहिवासी परमेश्वर कुशवाह यांचा मुलगा अमित कुशवाह याच्या लग्नापूर्वी बुधवारी रात्री उशिरा हळदीचा विधी पार पडला. घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीसमोर मटकोड (विवाहपूर्व सोहळा) सुरू होता. ज्या विहिरीजवळ हा कार्यक्रम सुरू होता ती जाळीदार स्लॅब बनवून बंद करण्यात आली होती. विधीच्या वेळी विहिरीवर बनवलेल्या स्लॅबवर महिला, तरुणी मोठ्या संख्येने उभ्या होत्या. दरम्यान, यावेळी स्लॅबवर जाऊ नका असे सांगत तो तुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, कोणीही ऐकले नाही. अचानक स्लॅब तुटल्याने त्यावर उभ्या असलेल्या महिला, मुली विहिरीत कोसळल्या. विहीर खूप खोल होती आणि तिच्यात बरेच पाणी होते. विहिरीची दुरवस्था व त्यातील पाणी यामुळे जखमींना बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.

पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने सर्वांची सुटका केली. मात्र, दीड तास लागला आणि तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 11 जखमींना जिल्हा रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर कोतवा सीएचसीमध्ये दाखल असलेल्या दोन मुलांचाही मृत्यू झाला. इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago