देश

बापरे! जंगलाला लागलेली आग अनियंत्रित, आग वस्तीपर्यंत पोहोचल्याने चिंतेत भर…

देहरादुन : उत्तराखंड आणि हिमाचलमधील जंगलात लागलेली आग अनियंत्रित झाली आहे. आग आता जंगलातून रहिवासी भागाकडे सरकू लागली आहे. उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील 6 पर्वतरांगांची जंगले सतत जळत आहेत. गणखेत रांग, बैजनाथ रांग, धर्मघर रांग, पिंडारी या भागातील बहुतांश जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी आहेत. याच गणखेत वन परिक्षेत्रातील आग वस्तीपर्यंत पोहोचली असून तेथे 12 गोठ्यांसह शेकडो गवताचे ढीग जळून राख झाले आहेत.

घटनास्थळी दाखल झालेले जिल्हा प्रशासन, अग्निशमन विभाग, पोलीस प्रशासन आणि वनविभाग आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. आगीमुळे ग्रामस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेशातील सोलनमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. बरोगपाठोपाठ आता कांदाघाट, केठलीघाट, कानोहची जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. आगीच्या ज्वाळा कित्येक किलोमीटरपर्यंत दिसत आहेत. आकाशात सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत. गेल्या तीन दिवसांत 200 हेक्टरहून अधिक जंगलाला आग लागली आहे. हिरवीगार जंगले जळून राख झाली आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची वनसंपदा आणि वन्यजीवांचे मोठे नुकसान झाले आहे.

अलीकडेच, 28 मार्च रोजी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील सरिस्का व्याघ्र प्रकल्पातील पृथ्वीपुरा-बलेटा गावातील जंगलाच्या डोंगरावर आग लागली. काही वेळातच ही आग अनेक किलोमीटर परिसरात पसरली. आगीची माहिती मिळताच सिव्हिल डिफेन्सच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले व ग्रामस्थांच्या मदतीने आठ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago