बीड

२४ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार, घरगुती भांडणाचा फायदा घेत केले भयंकर कृत्य…

बीड : एका २४ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चुलत पुतण्याने ज्यूसमध्ये गुंगीचे औषध टाकून या महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अन्य दोघांसह महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात चुलत पुतण्या अजय गवते याच्यावर बलात्काराचा गुन्हा तर पप्पू नरहरी गवते, दत्ता गवते, परमेश्वर गवते (सर्व रा. बेलुरा) या तिघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ती आपला नवरा, २ लहान मुलं आणि सासुसह पुण्यात वास्तव्यास आहे. मात्र, ४ एप्रिलला तिचे नवऱ्यासोबत किरकोळ भांडण झाले, त्यामुळे ती तिच्या माहेरी बीडला गेली. मात्र आईने ‘तू एकटीच का आलीस, परत तुझ्या नवऱ्याकडे जा’ असं सांगितलं. त्यामुळे ती बीड शहरातील आपल्या मैत्रिणीकडे काही दिवस राहिली. त्यानंतर ११ एप्रिलला पीडिता रात्री ट्रॅव्हल्सने पुण्याला निघाली.

यादरम्यान पीडितेचा चुलत पुतण्या असणारा आरोपी अजय गवते याने फोन केला. तो म्हणाला की मला काकांनी तुम्हाला घेऊन यायला सांगितलं आहे, तुम्ही अहमदनगरच्या चांदणी चौकात उतरा. पीडिता तिथे उतरली तेव्हा अजय तिथे आला आणि आता खूप रात्र झाली आहे, आपण लॉजवर मुक्काम करू आणि उद्या निघू, असं म्हणाला’. त्यानंतर लॉजवर आल्यावर अजयने तिला ज्यूसमध्ये गुंगीचे औषध टाकून दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. अश्लील फोटो आणि व्हिडिओ देखील काढले. दुसऱ्या दिवशी आरोपीने पीडितेला जीपमध्ये बसवून पुन्हा बीडला पाठवले.

यादरम्यान पीडिता हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाली असताना बेलुरा गावातील दत्ता गवते याचा फोन आला. तो म्हणाला की, ‘ते अश्लिल व्हीडिओ माझ्याकडे आहेत. तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल’, असं म्हणत त्याने पीडितेला ब्लॅकमेल केलं. तो हॉस्पिटलजवळ आला आणि पीडितेला दुचाकीवर बसवून काठवटवाडी येथे घेऊन गेला. आरोपी दत्ता गवते याने दुचाकी ओढ्याजवळ थांबवली. मागून दुचाकीवर येणाऱ्या परमेश्वर गवते याला बोलावले. दोघांनी तिला शेतातील विहीरीजवळ नेले. मग फोन करुन पप्पु गवतेला बोलावले. या तिघांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता दत्ता व परमेश्वरने पीडितेला नवगण राजुरी येथील बसस्टॉपवर सोडले.

पीडिता तिच्या आईकडे गेली आणि घडलेला प्रकार तिने आईला सांगितला. त्यानंतर नवऱ्याला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली. सध्या आरोपी फरार असून पोलीस तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचे आकस्मिक निधन, चाहत्यांमध्ये शोककळा

मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…

2 दिवस ago

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…

2 दिवस ago

तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी; भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर

मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…

2 दिवस ago

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…

4 दिवस ago

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

5 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

1 महिना ago