देश

बनावट डॉक्टर दाम्पत्याने महिलेवर केले IVF उपचार, महिलेच्या मृत्यूनंतर धक्कादायक खुलासा…

कर्नाटक : कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात एका महिलेच्या मृत्यूनंतर कर्नाटक पोलिसांनी एका बनावट डॉक्टर दाम्पत्याला अटक केली आहे. या दाम्पत्याने अपत्यहीन महिलेवर इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) द्वारे उपचार केले. उपचारानंतर महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून बनावट डॉक्टर दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.

वाणी आणि मंजुनाथ अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी जवळपास 100 जोडप्यांवर आयव्हीएफद्वारे उपचार केल्याचे सांगण्यात येत आहे. उपचाराच्या नावाखाली या दाम्पत्याने लोकांकडून लाखो रुपयेही वसूल केले. दरम्यान, या दाम्पत्याकडे वैद्यकीय पदवी नसल्याचा धक्कादायक खुलासा तपासात झाला आहे. ते फक्त १० वी पास आहेत.

मृत महिला ममता यांचा पती मल्लिकार्जुन यांनी पोलिसात तक्रार केली होती. मल्लिकार्जुन आणि ममता यांना लग्नाला १५ वर्षे उलटूनही मूल झाले नाही. त्यांनी अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले, पण काही उपयोग झाला नाही. अखेर मल्लिकार्जुन यांनी तुमकूरमधील आयव्हीएफ केंद्राशी संपर्क साधला. बनावट डॉक्टर जोडप्याने मल्लिकार्जुन आणि ममता यांच्यावर यशस्वी उपचार करण्याचे आश्वासन दिले. उपचाराच्या नावाखाली त्यांच्याकडून चार लाख रुपये घेतले आणि आयव्हीएफ उपचारही केले.

IVF उपचारानंतर ममता यांना अनेक आजारांनी ग्रासले. त्यांनी डॉक्टरांना याचे कारण विचारले असता बनावट डॉक्टरांनी सांगितले की, गर्भात भ्रूण विकसित झाल्यानंतर हे बदल होत आहेत. त्यानंतर बनावट डॉक्टर या दाम्पत्याकडून अधिक पैसे उकळू लागले. वेदना वाढल्याने ममता तपासणीसाठी दुसऱ्या रुग्णालयात गेल्या. त्यावेळी तपासात ममता गर्भवती नसल्याचे समोर आले. ममताला किडनी, हृदय, मेंदू आणि गर्भाशयात समस्या येऊ लागल्या. ममता यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र 23 एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago