देश

भारतीयांना फायनल वॉर्निंग! खारकीव्ह सोडा, वाहन नसेल तर तात्काळ पायी निघा, परराष्ट्र मंत्रालयाची सूचना

नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियामधील युद्ध धोकादायक स्थितीत पोहोचले आहे. खारकीव्ह ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्याने हल्ले तीव्र केले आहेत. रशियाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाकडून खारकीव्हमधील सुरक्षित ठिकाणांची माहिती देण्यात आली आहे. खारकीव्हमध्ये उपस्थित असलेल्या सर्व भारतीयांनी खारकीव्ह जवळील पिसोचिन, बेझलुडोव्हका आणि बाबे येथे जावे. परराष्ट्र मंत्रालयाने ही तिन्ही ठिकाणे सेफ झोन म्हणून घोषित केली असून नागरिकांना आज (युक्रेनियन वेळ) ६ वाजेपर्यंत या भागात पोहोचण्यास सांगितले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची माहिती दिली. युक्रेन सोडून जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. आतापर्यंत सुमारे १७,००० भारतीय नागरिकांनी युक्रेनच्या सीमा सोडल्याचा अंदाज आहेत, असे ते म्हणाले.

भारतीय हवाई दलाचे विमान C-17 बुखारेस्ट (रोमानिया) येथून ऑपरेशन गंगामध्ये सहभागी झाले आहे, हे विमान आज रात्री दिल्लीला परतणे अपेक्षित आहे. बुडापेस्ट (हंगेरी), बुखारेस्ट (रोमानिया) आणि रझेझो (पोलंड) येथून आज आणखी तीन उड्डाणे होणार आहेत. ज्यांनी भारतीय पासपोर्ट गमावले आहेत त्यांना आपत्कालीन प्रमाणपत्र जारी करण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे, असे अरिंदम बागची यांनी सांगितले. मला वाटते की यामुळे अनेक भारतीय विद्यार्थ्यांनाही मदत होईल. त्यांनी सांगितले की, युक्रेन सोडून जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. आतापर्यंत सुमारे १७,००० भारतीय नागरिकांनी युक्रेनच्या सीमा सोडल्याचा अंदाज आहे.

भारताने ४ मार्चला ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनच्यामशेजारील देशांमधून ९ उड्डाणे भारतीयांना घेऊन भारतात पोहोचतील. आतापर्यंत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना १६ विमानांद्वारे मायदेशात आणण्यात आले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याच्या योजनेला सरकारने वेग दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. जास्तीत जास्त भारतीयांना आणण्यासाठी एकूण फ्लाइट्सची संख्या वाढवण्यात आली आहे. युक्रेन सीमेवर अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ४ मार्चपर्यंत एकूण ३६ उड्डाणे करण्यात येणार आहेत. ही उड्डाणे एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि स्पाइसजेटच्या ताफ्यातील आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago