देश

आश्रमाच्या स्वामीचा अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे बलात्कार, अखेर ‘अशी’ झाली सुटका…

आंध्रप्रदेश : आश्रमाच्या स्वामीने एका अनाथ मुलीवर दोन वर्षे बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पीडित अनाथ मुलीने केलेल्या तक्रारीवरून कारवाई करत पोलिसांनी आरोपी स्वामीला सोमवारी मध्यरात्री अटक केली. पीडितेचे वय 15 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.

पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिचे आई-वडील फार पूर्वीच मरण पावले आहेत. नातेवाइकांनी तिला राजमहेंद्रवरमजवळील वसतिगृहात दाखल केले होते. जिथे तिने पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी काही साधूंच्या माध्यमातून ती संबंधित आश्रमात सेवेसाठी पोहोचली. तिला आश्रमातील गायींची सेवा करण्याचे काम देण्यात आले होते. गायी चारणे आणि त्यांचे शेण साफ करणे हे तिचे काम होते. मात्र रात्री आश्रमाचा स्वामी तिला त्याच्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार करायचा. तो मुलीला धमकावत असे की जर तिने त्याचे ऐकले नाही तर तो तिला ठार मारेन. पीडितेने स्वामींना विरोध केला, तेव्हा त्याने तिला साखळीने बांधून ठेवण्यास सुरुवात केली. तिला जेवायला फक्त भात आणि पाणी दिले जायचे.

13 तारखेला आश्रमात काम करणाऱ्या मोलकरणीच्या मदतीने पीडित मुलीने तिथून पळ काढला. मोलकरणीने तिला पैसेही दिले होते. तिथून ती ऑटोने थेट विशाखापट्टणम रेल्वे स्टेशनवर पोहोचली. तिथे ती तिरुमाला एक्सप्रेसमध्ये चढली. ट्रेनमधील एक महिला प्रवाशी तिच्याशी बोलली. पीडितेने सर्व प्रकार त्या महिलेला सांगितला. त्यानंतर त्या महिला प्रवाशाने मुलीला तिच्यासोबत राजमहेंद्रवरम येथे नेले. यानंतर ही महिला इतर काही लोकांसोबत मुलीला घेऊन विजयवाडा येथील बाल कल्याण समितीकडे गेली. तेथे मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा खुलासा केला. विजयवाडा येथील बाल कल्याण समितीसमोर मुलीने आश्रमाबाबत सांगितले. तिने सांगितले की, आश्रमात 14 मुले होती, त्यापैकी ती एकमेव मुलगी होती. पीडितेने सांगितले की, आश्रमातील लोक म्हणायचे की, स्वामींनी यापूर्वी देखील अन्य एका मुलीवर बलात्कार केला होता.

CWC सदस्यांनी मुलीला विजयवाडा येथील दिशा पोलिस ठाण्यात पाठवले, जिथे पोलिसांनी मुलीची चौकशी केली आणि तिचे म्हणणे ऐकून घेत गुन्हा नोंदवला. प्रकरणाचे गांभीर्य पाहून तात्काळ एफआयआर नोंदवण्यात आली. स्वामीजीविरुद्ध कलम ३७६ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी बेजवाडा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी स्वामीला ताब्यात घेतले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago