crime
अंधश्रद्धेतून आई-वडिलांनी स्वतःच्या दोन मुलींची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी सतयुग सुरु होणार असल्यामुळे सूर्योदयाला दोन्ही लेकी पुन्हा जिवंत होतील, असा दावा या माता-पित्याने केला. अंधश्रद्धेतून आई-वडिलांनी मुलींचा अशा प्रकारे जीव घेतल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, आंध्र प्रदेशातील हे आरोपी दाम्पत्य उच्चशिक्षित असून दोघंही मुख्याध्यापक आहेत.
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामधील मदनापल्ले गावात रविवारी रात्री हत्याकांड घडले. 27 वर्षीय अलेख्या आणि 22 वर्षीय साईदिव्या अशी मृत तरुणींची नावं आहेत. शिवालयम मंदिर रोड परिसरात नायडू कुटुंब राहत होतं. मोठी मुलगी अलेख्याने भोपाळमधून मास्टर्स डिग्री मिळवली, तर साईदिव्या हिचं बीबीएपर्यंत शिक्षण झालं होतं. साईदिव्या मुंबईत एआर रहमान म्युझिक स्कूलची विद्यार्थिनी होती.
नायडू कुटुंब लॉकडाऊनच्या काळात विचित्र वागत होतं, अशी माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. रविवारी रात्री घरातून आरडाओरड ऐकल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. डोक्यात डंबेल्सनी प्रहार करुन निर्दयी मातापित्याने लेकींचा बळी घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांनी घरात जाऊन पाहणी केली तेव्हा एका मुलीचा मृतदेह पूजेच्या खोलीत होता, तर दुसरी मुलगी बेडरुममध्ये मृतावस्थेत आढळली. दोघींचे मृतदेह लाल रंगाच्या कापडाने झाकलेले होते.
पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला हत्येचं कारण विचारलं असता त्यांनी अजब जबाब दिला. कलियुग समाप्त होत असून सोमवारपासून सतयुग सुरु होणार आहे. त्यामुळे दोन्ही मुली सूर्योदयासोबत जिवंत होतील, असा दावा त्यांनी केला. पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला ताब्यात घेतलं असून दोघींचे मृतेदह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…