मनोरंजन

ब्रेकिंग : जयश्री रमैया या अभिनेत्रीचा संदिग्ध अवस्थेत मृत्यू

कन्नड अभिनेत्री आणि बिग बॉस कन्नड स्पर्धक जयश्री रमैया यांचा संदिग्ध अवस्थेत मृत्यू झाला आहे. आज (25 जानेवारी) जयश्रीचा मृतदेह बंगळुरूमधील पुनर्वसन केंद्रात लटकलेल्या अवस्थेत आढळला. मिळालेल्या माहितीनुसार ही अभिनेत्री नैराश्याने ग्रासलेली होती.

जयश्रीच्या मृत्यूमुळे संपूर्ण कन्नड इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षी जयश्रीने सोशल मीडियावरही अशी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यानंतर ती चर्चेत आली होती. जयश्रीने आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे सांगितले होते की ती डिप्रेशनची शिकार आहे आणि तिला माघार घ्यायची आहे. अभिनेत्रीने तिच्या ट्विटमध्ये लिहिले, ‘मी निरोप घेते! जग आणि उदासीनतेला गुड बाय’ जयश्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली होती. मात्र, यानंतर अभिनेत्रीने आणखी एक पोस्ट शेअर करत सांगितले की ती पूर्णपणे सुरक्षित आहे. तिने स्वतःला सावरले होते.

जयश्री रमैया बिग बॉस कन्नड सीझन 3 मधील स्पर्धक होत्या. बर्‍याच सहभागींपेक्षा जयश्रीला रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतल्यानंतर जास्त कामाच्या संधी मिळाल्या नव्हत्या. रिपोर्ट्सनुसार, जयश्री कामाच्या संधी न मिळाल्याबद्दल नाखूष होती आणि तिने तिच्या मित्र-मैत्रिणींकडे याबद्दल अनेकदा तक्रार केली होती. आज तिचा मृतदेह आढळून आल्याने शोक व्यक्त केला जात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago