देश

दहशतवाद्यांचा माजी पोलीस अधिकाऱ्याच्या घरात घुसून केला अंदाधुंद गोळीबार… तीन जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात हरिपरीगाम येथे दहशतवाद्यांनी घरात घुसून एका माजी विशेष पोलीस अधिकारी (SPO) आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली. फय्याज अहमद यांच्यासहीत त्यांच्या पत्नीची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या हल्ल्यात त्यांची अल्पवयीन मुलगी देखील गंभीर जखमी झाली होती. तिचादेखील उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रविवारी रात्री ही खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. सुरक्षा दलानं संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी विशेष पोलीस अधिकारी फय्याज अहमद यांच्या घरावर दहशतवाद्यांनी रात्रीच्या वेळी हल्ला केला. दहशतवाद्यांनी थेट घरात घुसून अंदाधुंद गोळीबार करत त्यांची हत्या केली. रात्री ११.०० वाजल्याच्या सुमारास पुलवामाच्या अवंतीपोरा भागातील इरिपरिगाम भागात ही घटना घडली. या घटनेत फय्याज अहमद यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर झालेल्या त्यांच्या पत्नीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांची गंभीर जखमी झालेली मुलगी राफिया हिनेदेखील काही तासांतच अखेरचा श्वास घेतला.

याआधी रविवारी पहाटे जम्मूतील हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांकडून बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. जम्मूत हवाई दलाच्या तळावर ड्रोनने हल्ला करण्यात आला असून हे ड्रोन पाकिस्तानातून आल्याचं गुप्तचर संस्थांनी सांगितलं आहे. देशात भारतीय सैन्यावर ड्रोनद्वारे हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago