मनोरंजन

अभिनेत्री हीना पांचाळसह 22 जणांना हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीत अटक

नाशिक : अभिनेत्री हीना पांचाळ हिला पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमधील इगतपुरी येथे हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. तिथून ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हीना पांचाळ हिला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या पार्टीत एकूण २२ जण ड्रग्ज, कोकेन, गांजा यांचं सेवन करत होते. यात बॉलिवुडमधील दोन कोरिओग्राफर, तामिळ आणि हिंदी चित्रपटांत अभिनय केलेल्या अभिनेत्रींचा समावेश असल्याची माहिती समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास इगतपुरी येथील स्काय ताज व्हिला व स्काय लगून व्हिला या दोन खासगी बंगल्यांमध्ये ड्रग्ज पार्टी होत असल्याची माहिती नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला आणि ‘रेव्ह पार्टी’च्या नावाखाली ड्रग्सचं सेवन करणाऱ्या सर्वांना ताब्यात घेत इगतपुरी पोलीस ठाण्यात आणले. संबंधितांविरुध्द विनापरवाना अंमली पदार्थ बाळगणे, त्याचे सामूहिकपणे सेवन करणे आणि कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करत गर्दी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थांचा पुरवठा कोणी केला याबाबतचा तपास करण्याकरिता नाशिक ग्रामीण पोलिसांचे एक स्वतंत्र पथक मुंबईत रवाना करण्यात आले आहे.

हीना पांचाळ ही ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ट एन्ट्री म्हणून सहभागी झाली होती. हीना पांचाळनं हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय हिंदी, मराठी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये तिनं ‘आयटम साँग’ केले आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 महिने ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago