देश

चिमुकलीने धाडस दाखवत वाचवले आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या आईचे प्राण

भोपाळ : आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे रुळावर गेलेल्या एका महिलेला तिच्या आठ वर्षाच्या मुलीने वाचवले. मात्र, रेल्वेच्या धक्क्यामुळे ट्रॅकच्या बाजूला पडलेल्या महिलेला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे या महिलेचा जीव वाचला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम नगर येथे राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. तिला दोन मुले आहेत. ही महिला रविवारी 5.15 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे रुळावर गेली होती. यावेळी तिची आठ वर्षांची मुलगीसुद्धा तिच्यामागे गेली. त्यावेळी तिने बघितले की तिची आई समोरून येणाऱ्या रेल्वेसमोर जाण्याच्या प्रयत्नात होती. त्यामुळे या चिमुकलीने धाडस दाखवत तिच्या आईचा हात धरून तिला बाजूला खेचले. मात्र तेवढ्यात रेल्वे आल्याने या महिलेला रेल्वेचा धक्का लागला आणि ती बेशुद्ध होऊन ट्रॅकच्या बाजूला पडली.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ या महिलेला जेपी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे उपचार केल्यानंतर या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तिची प्रकृती स्थिर आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

7 दिवस ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago