देश

जम्मूत CISF च्या बसवर दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद, 10 जवान जखमी

जम्मू : जम्मूतील चड्ढा कॅम्पजवळ शुक्रवारी पहाटे ४ वाजता दहशतवाद्यांनी CISF च्या बसवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी बसवर ग्रेनेड फेकले, या बसमध्ये १५ जवान होते. CISF ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हल्ल्यानंतर घटनास्थळी चकमक झाली, त्यानंतर चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवादी पळवून गेले. या चकमकीत एएसआय शहीद झाल्याचे वृत्त असून १० जवान जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील सुंजवान भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एक सुरक्षा दल शहीद झाल्याची माहिती आहे, तर 4 जवान जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री परिसराची नाकेबंदी केली होती. दरम्यान, अजूनही चकमक सुरू असून दहशतवादी घरात लपून बसले आहेत.

दरम्यान, गुरुवारी पहाटे बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर युसूफ कंत्रूसह चार दहशतवादी ठार झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांनी सांबा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्यापूर्वी या भागातील दहशतवादी कारवाया तीव्र झाल्या आहेत. सुंजवानमध्ये ज्या ठिकाणी चकमक होत आहे तिथून सांबा जवळच आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago