क्रीडा

बेस्ट फिनिशर धोनी…! शेवटच्या चेंडूवर CSK ला मिळवून दिला रोमहर्षक विजय

IPL 2022 : महान खेळाडू महेंद्रसिंग धोनीने गुरुवारी IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्जला मुंबई इंडियन्स विरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून दिला. धोनीने खेळाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारला,आणि चेन्नईच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, यामुळे मुंबईच्या पहिल्या विजयाच्या आशेवर मात्र पाणी फिरले.

सीएसकेचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने नवीन चेंडूवर सुरुवातीलाच तीन महत्वाच्या विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्सने 7 बाद 155 धावा केल्या. धोनीने 13 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या, त्याने त्‍याच्‍या अद्वितीय शैलीत फिनिशरप्रमाणे फलंदाजी करत सीएसकेला मोसमातील त्‍यांचा दुसरा विजय मिळवून देण्यासाठी अंतिम षटकात आवश्‍यक 17 धावा मिळवण्‍यात मदत केली. अखेरच्या ४ चेंडूत १६ धावांची आवश्यकता होती. यावेळी धोनीने जयदेव उनाडकटच्या षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर एक षटकार आणि चौकार ठोकला. त्यानंतर पुढील चेंडूवर त्याने वेगाने धावत २ धाव काढल्या आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. अखेरच्या चेंडूवर शानदार चौकार मारून धोनीने अतिशय आश्चर्यकारक विजय चेन्नई सुपर किंग्जला मिळवून दिला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

19 तास ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago