देश

नर्सच्या कानशिलात लगावणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, शवविच्छेदन न करता मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील रामपूरमध्ये शासकीय डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीमध्ये आढळला आहे. हा तोच डॉ. बी. एम. नागर आहे, ज्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, ज्यात एका नर्सने प्रथम त्याच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर डॉक्टरांनी नर्सला थप्पड मारली. त्यानंतर तेथे असलेल्या लोकांनी त्यांचा वाद मिटवला होता. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीएमने या डॉक्टरला कामावरून हटवलं होतं, परंतु नंतर पुन्हा डॉक्टरला सेवेत घेतलं होतं.

डॉ. बी. एम. नागर यांचा मृतदेह त्यांच्या सरकारी निवासस्थानी आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. आरोग्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर या डॉक्टरचा मृतदेह खासगी रुग्णवाहिकेतून त्याच्या मूळ गावी पाठविण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यानंतर घटनास्थळी पोलिस आले आणि त्यांनी डॉक्टरचा मृतदेह सरकारी निवासस्थानीच ठेवण्यास सांगितले.

त्यानंतर डॉ. बी.एम.नागर यांचे कुटुंबीय घटनास्थळी पोहचले. विशेष म्हणजे, त्यांनी एसपीला लेखी पत्र दिले की आम्हाला मृतदेहाचे पोस्टमार्टम करायचे नाही. यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. परंतु, शवविच्छेदन न करता मृतदेह ताब्यात कसा देण्यात आला? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. बी.एम.नागर यांनी आपल्या जीविताला धोका असल्याचे सांगितले होते.

या घटनेनंतर डॉ. बी.एम.नागर यांनी पोलिस अधीक्षक शुगन गौतम यांना पत्र लिहून आपल्या जीविताला धोका असल्याचे सांगितले. आता डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीमध्ये आढळला आहे. जिल्हा रूग्णालयाचे सीएमएस आरके मित्तल म्हणाले की, हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे दिसून येत आहे, त्यांचा बीपी आणि साखर देखील बरीच वाढलेली होती. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर, त्यांना शुगर आणि हार्टच्या समस्या होत्या, त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांचे सहकारी डॉक्टर आणि कुटुंबीयांनी देखील लिहून दिले आहे की हा नैसर्गिक मृत्यू आहे आणि यात कोणत्याही पोलिस कारवाईची आवश्यकता नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago