pimpari chinchwad unknown person fired on ncp mla anna bansode
पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाला आहे. ही घटना आज (बुधवारी, दि. 12) दुपारी दीड वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पिस्तुलातून गोळी झाडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र नेमक्या कोणत्या कारणातून हा गोळीबार करण्यात आला, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरू केला असून या तपासानंतरच गोळीबारामागील नेमकं कारण कळू शकणार आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे हे 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून निवडून आले आहेत. अण्णा बनसोडे यांनी 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा पराभव केला होता. अण्णा बनसोडे अजित पवार समर्थक आमदार मानले जातात.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…