Supreme Court notice to Facebook and WhatsApp
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी करत म्हटलं कि, आपली कंपनी २-३ लाख कोटी डॉलर्सची असेल, परंतु लोकांची प्रायव्हसी यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने सुनावणीवेळी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिसा बजावल्या आहेत.
व्हॉट्सअॅपला नोटीस बजावत यावर्षी जानेवारीत भारतात लागू करण्यात आलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीला आव्हान देणाऱ्या याचिकेला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. आता चार आठवड्यांनंतर या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होईल.
सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान सांगितले की, लोकांना शंका आहे की त्यांची गोपनीयता धोक्यात आहे आणि त्यांचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. त्याचवेळी कोर्टाने सांगितले की आपली कंपनी २-३ लाख कोटी डॉलर्सची असेल, परंतु लोकांची प्रायव्हसी यापेक्षा अधिक मौल्यवान आहे.
या याचिकेत म्हटले आहे की व्हॉट्सअॅपने युरोप आणि भारतासाठी वेगवेगळे मापदंड अवलंबले आहेत. यासंदर्भात व्हॉट्सअॅपने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे की, “युरोपचा प्रायव्हसी बाबत खास कायदा आहे, जर भारतात देखील असाच कायदा असेल तर आम्ही त्याचे पालन करू.”
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…