देश

ब्रेकिंग : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना कोरोनाची लागण, काल स्टेजवर आली होती चक्कर

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल विजय रुपाणी एका कार्यक्रमाच्या स्टेजवर चक्कर येऊन बेशुद्ध पडले होते. यानंतर त्यांना यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाने जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिननुसार सीएम रुपाणी यांची प्रकृती स्थिर आहे.

डॉ. आर. के. पटेल यांनी सोमवारी सांगितले की, “विजयभाई यांचे ईसीजी, इको, सीटी स्कॅन, ऑक्सिजन पातळी सारखे अहवाल सामान्य आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे, रुग्णालयात 24 तास त्यांचे परीक्षण केले जाईल. डिहायड्रेशन, थकवा आणि तीव्र कामांमुळे त्याला चक्कर येत होती.”

मुख्यमंत्री विजय रुपाणी रविवारी प्रचारासाठी वडोदराच्या निजाम पुरा येथे दाखल झाले, परंतु तेथे त्यांना अचानक चक्कर आली आणि ते मंचावर पडले. त्याचा बीपी कमी झाला असावा, असा अंदाज लावण्यात आला होता. यानंतर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना सरकारी विमानाने अहमदाबाद येथे आणले गेले. त्यांना अहमदाबादमधील यू.एन. मेहता रुग्णालयात हलविण्यात आले होते. जिथे त्यांच्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या. आता त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. परंतु, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

8 तास ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 दिवस ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 महिने ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 महिने ago