देश

धक्कादायक! बकऱ्याचा बळी देताना कापली बकऱ्याला धरणाऱ्या माणसाचीच मान…

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे सणानिमित्त बकऱ्याचा बळी दिला जात होता, मात्र यावेळी बकऱ्याऐवजी ज्या व्यक्तीने बकऱ्याची मान धरली होती, त्याचीच मान कापली गेली.

आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे ही भयंकर घटना घडली आहे. वृत्तानुसार, येथील वलसापल्ले येथील मंदिरात संक्रांतीनिमित्त बलिदानाचा विधी केला जात होता. येथील लोक दरवर्षी संक्रांती उत्सवात प्राण्यांचा बळी देतात आणि स्थानिक येल्लम्मा मंदिरात अर्पण करतात. नेहमीप्रमाणे यावेळीही हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी एक बोकड आणण्यात आला होता आणि त्याचा बळी द्यायचा होता. मात्र यादरम्यान कार्यक्रमात जे काही घडले त्यामुळे एकच खळबळ उडाली. बकऱ्याचा गळा कापणाऱ्याचे नाव चलापथी असून बकऱ्याला धरणाऱ्याचे नाव सुरेश आहे. बळी देण्याची प्रक्रिया सुरू असताना चलापथीने बकऱ्याऐवजी सुरेशचा गळा कापला. त्याची मान कापताच तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला.

एका अहवालात पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, आरोपीने दारूचे सेवन केलेले होते आणि तो दारूच्या नशेत होता. दरम्यान, सुरेशला जवळच्या मदनपल्ले येथील शासकीय रुग्णालयात नेले, मात्र त्याचा मृत्यू झाला. आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत सुरेश विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. चलापथीचा सुरेशसोबत काही वाद होता का, याची पोलीस चौकशी करत आहेत. पुढील तपास सुरू करण्यात आला असून चौकशी सुरू आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago