The reason for the decrease in sexual desire in many women
अमेरिका : एका महिलेने तिच्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर इन्सुलेशन स्प्रे चा वापर केला, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यामुळे पीडित व्यक्ती पुन्हा कधीही सेक्स करू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एका 45 वर्षीय पुरुषाला प्रायव्हेट पार्टशी संबंधित काही समस्या होत्या, त्या समस्यांवर उपाय करण्याच्या उद्देशाने या व्यक्तीच्या पत्नीने भिंतीवरील पोकळी भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इन्सुलेशन स्प्रेचा वापर तिच्या नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर केला होता.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार ही घटना अमेरिकेतील आहे. पीडित व्यक्तीच्या पत्नीच्या कृत्यामुळे पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जखमा देखील झाल्या होत्या. तथापि, या घटनेच्या तीन आठवड्यांनंतरही ही व्यक्ती डॉक्टरांकडे गेली नाही आणि जखम आपोआप बरी होईल या आशेवर राहिली. त्यामुळे पीडित व्यक्तीची तब्येत जास्तच बिघडली.
तीन आठवडे उपचार न केल्याने त्या व्यक्तीच्या जखमा पसरल्या. त्याला लघवीचा त्रासही होऊ लागला. त्याच्या शरीरातून लघवीऐवजी रक्तही येऊ लागले. अखेर डॉक्टरांकडे गेल्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून इन्सुलेशन मटेरियल काढण्यात आले. या पुरुषाच्या उपचारादरम्यान, डॉक्टरांना पेरीनियल युरेथ्रोस्टोमी नावाची जटिल शस्त्रक्रिया देखील करावी लागली. शस्त्रक्रियेनंतर या व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी त्याला मूत्रमार्गाची पुढील शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
डॉक्टर अनेकदा इशारा देत असतात की प्रायव्हेट पार्टमध्ये काही समस्या असल्यास उशिरा हॉस्पिटलमध्ये जाण्यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. तथापि, काही लोक लाज वाटत असल्यामुळे सुरुवातीच्या काळात डॉक्टरांकडे जाण्याचे टाळतात. मात्र, असे न करता समस्या उद्भवल्यास डॉक्टरांकडे जाणे केव्हाही चांगले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…