देश

धक्कादायक : अंथरुणात लघवी केली म्हणून वडिलांनी मुलाला जमिनीवर आपटून ठार मारले

उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका वडिलांनी आपल्या तीन वर्षाच्या मुलाला निर्दयपणे मारहाण करून ठार मारले. मुलाचा दोष हा होता की त्याने वडिलांच्या अंथरुणात लघवी केली होती. घटनेनंतर आरोपीने पत्नी आणि आपल्या दोन मुलींना धमकावले की ही गोष्ट कोणाला सांगितली तर संपूर्ण कुटुंबाला ठार मारेल.

हमीरपूर जिल्ह्यातील छनी खुर्द येथे राहणारा संतराम प्रजापती मजूर आहे. त्याचा परिवार पत्नी अनिता, दोन मुली अंजना आणि खुशी आणि एकुलता एक मुलगा रवींद्र (3 वर्षे) असा आहे. घाटमपूरमधील हातरूआ गावाजवळ असलेल्या वीटभट्टीत काम करण्यासाठी संतराम काही दिवसांपूर्वी आला होता. तो कुटुंबासमवेत भट्टीवर असलेल्या एका कच्च्या घरात राहत होता.

आरोपीची पत्नी अनिताने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी मुलगा रवींद्रने वडिलांच्या पलंगावर लघवी केली तेव्हा संतरामची झोप मोडली. तो इतका संतापला की त्याने रंगाच्या भरात मुलाला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. रडण्याचा आवाज ऐकून जवळच झोपलेल्या मुलीही उठल्या. त्या दोघींनी आपल्या भावाला वाचविण्यासाठी वडिलांसमोर हात जोडले. अनितानेही मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण संतरामने त्यांनादेखील मारहाण केली. त्यानंतर संतरामने मुलाला जमिनीवर आपटले आणि मरेपर्यंत मारहाण केली.

मुलाच्या मृत्यूनंतर संतराम पिशवीत मुलाचा मृतदेह घेऊन संपूर्ण कुटुंबाला घेऊन छानी खुर्द गावी गेला. मुलाच्या हत्येची बाब घराबाहेर गेली तर कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. संधी मिळताच पत्नी अनिताने आपला भाऊ अजय याला फोनवर सर्व काही सांगितले. यानंतर भाऊ अजयसह कुटुंबातील इतर सदस्य गावी पोहोचले. आरोपी संतरामला पकडून मारहाण केली आणि या घटनेची माहिती हमीरपूर पोलिसांना दिली. हमीरपूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन संतरामला अटक केली व घाटमपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. संतरामने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जात आहे.

थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 दिवस ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 दिवस ago

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…

1 दिवस ago

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य…

1 दिवस ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये…

2 आठवडे ago

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक…

3 आठवडे ago