SBI
मुंबई : बँकिंग फ्रॉडच्या वाढत्या घटना लक्षात घेत ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (SBI) ने कोट्यवधी खातेधारकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. आपली वैयक्तिक माहिती प्रायव्हेट ठेवण्याची सूचना एसबीआयने ट्विटरवरुन दिली आहे. ही माहिती इतरांसोबत शेअर करताना दोन वेळा विचार करा. तरच तुमच्या बँक खात्यातील पैसे सुरक्षित राहतील. बँकिंग फ्रॉड झाल्यास सायबर क्राईमकडे तक्रार नोंदवा, असंही एसबीआयने सांगितलं आहे.
थिंकेश्वर त्यांची वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवतात. नेहमीच ते कुठलीही माहिती इतरांसोबत शेअर करण्याआधी दोन वेळा विचार करतात. कृपया सायबर गुन्ह्यांची तक्रार https://cybercrime.gov.in इथे नोंदवा. कोणासोबतही वैयक्तिक माहिती शेअर करण्यापासून स्वतःला थांबवा. अन्यथा तुमचे बँक अकाऊण्ट रिकामे होईल. तुमचे पॅन डिटेल्स, INB डिटेल्स, यूपीआय पिन, एटीएम कार्ड नंबर, एटीएम पिन आणि यूपीआय वीपीए कोणासोबतच शेअर करु नका, अशा सूचना एसबीआयने दिल्या आहेत.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ वारंवार आपल्या ग्राहकांना फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी अलर्ट करत असते. एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांना फेक ईमेल्स पाठवले जात असल्याचं बँकेने नुकतंच सांगितलं होतं. त्या ईमेल्सशी एसबीआयचा कोणताही संबंध नाही, असे मेल ओपन करु नका, सोशल मीडियवर सावधगिरी बाळगा आणि कुठल्याही भ्रामक, खोट्या मेसेजेसना बळी पडू नका, असं आवाहन SBI ने केलं होतं.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…