rbi appoints firm for audit of hdfc bank
RBI ने HDFC बँकेवर नवीन डिजिटल सेवा सुरू करण्यास आणि नवीन क्रेडिट कार्ड देण्यास बंदी घातली होती. यानंतर आरबीआयने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेच्या संपूर्ण आयटी इन्फ्रास्ट्रक्चरचं ऑडिट करण्याची जबाबदारी ही बाहेरील व्यावसायिक आयटी फर्मकडे देण्यात आली आहे. बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 30 (1) B अंतर्गत आरबीआयने हा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला डिजिटल 2.0 अंतर्गत सर्व डिजिटल बिजनेसची निर्मिती करणारे उपक्रम थांबवण्यासाठी सांगितलं होतं. नवीन क्रेडिट कार्ड देण्यावरही बंदी घालण्यात आली होती. जर बँकेने संबंधित सर्व नियमांचं पालन केलं तरच आरबीआय हे सर्व निर्बंध हटवेल अशीही माहिती देण्यात आली आहे.
खरंतर, एचडीएफसी बँकेत अनेक तांत्रिक अडचणीमुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. काही दिवसांपासून एचडीएफसी बँकेच्या नेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टममध्ये मोठ्या अडचणी येत होत्या. याबद्दल ग्राहकांनी वारंवार तक्रारही केली होती. यामुळे आरबीआयने हे पाऊल उचललं आहे. 2 डिसेंबर रोजी आरबीआयकडून हा आदेश देण्यात आला होता. तर हे सगळे निर्बंध उठवण्यासाठा बँकेला नियमांचं काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचं आहे.
समोर आलेल्या अहवालानुसार, एचडीएफसी बँकेच्या प्राथमिक डेटा सेंटरमध्ये पॉवर फेल्यूअर झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या निर्णयामुळे एचडीएफसी बँकेच्या तांत्रिक त्रुटी स्पष्ट होतील आणि त्या दूर करता येतील, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. यामुळे ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी बँक अधिक सक्षम होईल.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…