महाराष्ट्र

ब्रेकिंग : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मॅनेजरला अटक, NCB ने घेतले ताब्यात

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मॅनेजरला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे. चौकशीसाठी समन्स बजावल्यापासून ऋषिकेश पवार फरार झाला होता. एनसीबी अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी धाड टाकली होती. त्यावेळी त्याच्या घरातील लॅपटॉपमध्ये महत्त्वाची माहिती मिळाली होती. त्यानंतर ऋषिकेशची हार्ड डिस्क एनसीबी अधिकाऱ्यांनी जप्त केली होती.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे अनेक ड्रीम प्रोजेक्ट होते. त्या प्रोजेक्टवर ऋषिकेश हा मॅनेजर म्हणून काम करत होता. सुशांतचा नोकर दीपेश सावंत याच्या चौकशीतही ऋषिकेश पवारचं नाव आलं होतं. ऋषिकेश पवारच्या विरोधात अनेक पुरावे एनसीबी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहेत. अटक टाळण्यासाठी ऋषिकेशने सेशन्स कोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यानंतर त्याला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावलं होतं, मात्र तेव्हापासून तो फरार होता.

एनसीबी अधिकाऱ्यांना त्याला शोधण्यात यश आलं असून ड्रग्स प्रकरणात चौकशीसाठी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याला ताब्यात घेतले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago