देश

हॉटेलमध्ये सुरु असलेले सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, 23 जणांना अटक, पोलिसांच्या समावेशाने खळबळ

नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील एका हॉटेलमध्ये सुरु असलेले सेक्स रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले. या कारवाईत 12 महिलांसह 23 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात काही पोलिसांचा देखील समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथील दनकौर परिसरातील चींती गावाजवळील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस आयुक्त ब्रिजनंदन राय यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची टीम तयार करण्यात आली. शनिवारी दुपारी पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकण्यात आला. यावेळी पोलिसांनी सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या 12 महिला आणि हॉटेलचे व्यवस्थापक यांच्यासह 11 पुरुषांना अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून आक्षेपार्ह साहित्य जप्त केले.

या सेक्स रॅकेटमध्ये दनकौर येथील पोलीसही सामील असल्याची अतिशय धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली. त्यानुसार चौकशीनंतर चार पोलिस हवालदार, एक हेड कॉन्स्टेबल आणि पोलिसांच्या जीप चालकाला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अजून कोणी यात सहभागी आहेत का, याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago