platform ticket price raised from rs 10 to rs 30
मुंबई : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनानं प्लॅटफॉर्म तिकीट देणं बंद केलं होतं. परंतु, वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना स्टेशनवर सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांसाठी रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा सुरू करण्यात आलंय. पण १० रुपयांना मिळणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता प्रवाशांना तीन पट जास्त अर्थात ३० रुपये मोजावे लागणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड या स्थानकांनी प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर ३० रुपयांवरून ५० रुपयांवर नेण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात कमी अंतराच्या प्रवाशांच्या गाड्यांच्या तिकीट दरात वाढ झाल्यानंतर आता ही दुसऱ्यांदा वाढ करण्यात येतेय. कोरोना काळात अनावश्यक प्रवासाला आळा घालण्यासाठी ‘किंचित भाडेवाढ’ केल्याचं स्पष्टीकरण यावेळी रेल्वे प्रशासनानं दिलं होतं. रेल्वे प्रशासनाकडून करोनाच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची लूट सुरू असल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…