Volvo C40 Recharge Fully-Electric Coupe SUV Unveiled with 420 kms range
मुंबई : पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे त्यामुळे दिग्गज वाहन कंपन्या २०२१ मध्ये इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, स्वीडिश कार निर्माती कंपनी व्हॉल्वोने त्यांची दुसरी इलेक्ट्रिक कार C40 रिचार्जचे लॉच केले आहे. यापूर्वी कंपनीने व्होल्वो एक्ससी 40 रिचार्ज ही इलेक्ट्रिक कार बाजारात सादर केली आहे.
व्हॉल्वो कंपनीने म्हटलं आहे की, C40 Recharge या कारमध्ये एसयूव्हीची सर्व वैशिष्ट्ये दिली जातील. यात ग्राहकांना लोअर आणि स्लीकर डिझाईन मिळेल. कंपनीने या नवीन इलेक्ट्रिक कारची रूफ लाईन अगदी खाली ठेवली आहे. त्याच वेळी, सर्वात मोठा फरक म्हणजे या कारच्या उंचीत केलेला बदल. या कारची उंची सी 40 रिचार्ज या कारच्या तुलनेत 3 इंचांनी कमी आहे. कंपनीची ही पहिली कार आहे ज्यामध्ये लेदरचा वापर केला जाणार नाही, याचाच अर्थ असा आहे की या कारमध्ये लेदर सीट दिली जाणार नाही. या कारमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित गुगलने विकसित केलेली इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाणार आहे.
याव्यतिरिक्त, व्होल्वो सी 40 रिचार्ज ऑपरेटिंग सिस्टिम दूरस्थपणे रिमोटने अपडेट करता येईल. कारमध्ये प्रत्येक एक्सेलवर इलेक्ट्रिक मोटरसह ऑल-व्हील ड्राईव्ह स्कीम आहे. फास्ट चार्जिंग सिस्टमसह, यात 78 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाईल, जो 408 hp पॉवर आणि 660 Nm टॉर्क जनरेट करतो. त्याचबरोबर यात 150 किलोवॅट डीसी फास्ट चार्जिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने आपण अवघ्या 40 मिनिटात कारची बॅटरी 80 टक्के चार्ज करू शकता. ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 420 किमीपर्यंतची रेंज देते. त्याचबरोबर, ही कार अवघ्या पाच सेकंदात शून्यापासून ताशी 100 किलोमीटरपर्यंतचा वेग पकडू शकते आणि या कारचं टॉप स्पीड ताशी 180 किलोमीटर इतकं आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…