देश

नितीन गडकरी यांनी केला धक्कादायक खुलासा, देशातील 30 टक्के वाहन परवाने बोगस

नागपूर : देशातील 30 टक्के वाहन परवाने बोगस असल्याचा धक्कादायक खुलासा केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी आपले अधिकारी आणि इंजिनियर्स यांना बोगस लायसन्स तसेच रस्त्यावरचे मृत्यू यासाठी जवाबदार धरले आहे. ते रस्ता सुरक्षा अभियानाच्या एका कार्यक्रमात नागपूरमध्ये बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी आपल्याच विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं आहे. वाहन परवाना घ्यायला सर्वात सोपा देश भारत आहे. आरटीओ ऑफिसर्सची माफी मागतो. पण, गांधीजी दिसले की मारा ठप्पा. सांगायला लाज वाटते पण 30% लायसन्स बोगस आहेत, असा दावा देखील त्यांनी केला. गरीब माणसालाही सुरक्षा हवी. एअर बॅग्स फक्त मोठ्या गाड्यांना का? सर्व गाड्यांना एअर बग्स हव्या, असे मत गडकरी यांनी व्यक्त केलं.

पैसे मिळाले की आरटीओ अधिकारी लायसन्स देतात अशी टीकाही त्यांनी केली आहे. तर रस्त्यावरच्या अपघाताला गडकरींनी आपल्याच इंजिनियर्सला जबाबदार धरले. रोड इंजिनियरिंग महत्वाचे आहे. अर्ध्या रस्त्यावरच्या मृत्यूंना तर इंजिनियर जबाबदार आहे. ह्यांचा डी पी आर, ह्यांचे लोक इतके फ्रॉड आणि बोगस आहेत. मी आता 12000 कोटी रुपये खर्च करून ब्लॅक स्पॉट्स ठीक केले आहे. पुणे-कोल्हापूर रस्त्यावर जयसिंगपूर येथे 150 लोकांना रस्ता वाकडा असल्यामुळे जीव गमवावा लागला. पण, कोणी काही केले नाही. तो मी ठीक केला आता कोणी तिथे पडत नाही, असंदेखील गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago