mother in law and daughter in law death in river narmada while taking selfi
मध्य प्रदेशातील जबलपूर येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. जिथे सेल्फी घेण्याच्या नादात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना न्यू भेडाघाट येथील धबधब्याजवळ घडली आहे. घाटकोपर, मुंबई येथील एक कुटुंब तिथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी सेल्फी घेताना सासू आणि होणारी सून या दोघी सेल्फी घेताना तोल जाऊन नर्मदा नदीत वाहून गेल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू हंसा सोनी धबधब्याजवळील खडकावर आपली भावी सून रिद्धीसोबत सेल्फी घेत होती. यावेळी सासूचा पाय घसरला आणि त्या दोघीही नर्मदा नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्या. सासूचा मृतदेह काही तासांनंतर सापडला तर, सुनेचा मृतदेह आज सकाळी सापडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मुंबईतील घाटकोपर भागातील आहे. शुक्रवारी 50 वर्षीय हंसा सोनी आपल्या भावी सून, 22 वर्षीय रिद्धी पिछडीया आणि अरविंद आणि राज सोनी यांच्यासह नवीन भेडाघाट येथे फिरायला आल्या होत्या. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास हंसा आणि रिद्धी या दोघी नवीन भेडाघाट येथील नर्मदेच्या काठावरील गोपाला हॉटेलजवळ सेल्फी घेण्यासाठी गेल्या. यावेळी त्या खडकावर उभ्या होत्या, त्यावेळी अचानक पाय घसरल्यामुळे दोघीही नदीत पडल्या. या दोघी नदीत पडताच सर्वत्र मदतीसाठी आरडाओरडा झाला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ बचावकार्यात सहभागी झाले. डाइव्हर आणि होमगार्डच्या मदतीने रात्री उशिरा हंसा सोनी यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला, मात्र रिद्धीचा मृतदेह आज सकाळी सापडला आहे.
धबधब्यात पडण्याच्या काही वेळापूर्वी रिद्धीने तिच्या भावी नवऱ्यासोबत सेल्फीही घेतली होती, जी तिची शेवटची सेल्फी ठरली. हे कुटुंब १२ जानेवारीला मुंबईला परतणार होते. मात्र त्यापूर्वीच ही दुःखद घटना घडल्यामुळे अरविंद आणि राज सोनी यांना मोठा धक्का बसला आहे. ते काही बोलण्याच्या मनस्थितीतही नाहीत. सध्या पोलिसांनी पंचनामा करून दोघींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
सेल्फीमुळे जीव गमवावा लागल्याची भेडाघाटातील ही पहिलीच घटना नाही. भेडाघाटातील या धबधबा परिसरात सुरक्षा व्यवस्था नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पर्यटकांना रोखण्यासाठी येथे सुरक्षा कर्मचारी हजर नसतात. तसेच येथे धोकादायक ठिकाण असल्याचे फलक देखील लावलेले नाहीत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…