तंत्रज्ञान

कारमध्ये सीएनजी किट बसवण्याचा विचार करताय? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या…

पुणे : सीएनजी गॅस हे पर्यावरणास अनुकूल इंधनांपैकी एक आहे. ते पेट्रोल आणि डिझेलपेक्षा खूपच स्वस्त आहे. त्यामुळे सीएनजी वापरल्यास पैशांची बचत होऊ शकते. दिल्ली, मुंबई, कोलकाता, लखनौ, पुणे, अहमदाबाद, इंदूर इत्यादी अनेक शहरांमध्ये सीएनजीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या ठिकाणी लोक CNG कार वापरतात किंवा त्यांच्या पेट्रोल किंवा डिझेल कारमध्ये CNG किट बसवतात. मात्र, त्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

सीएनजी किट बसवण्यापूर्वी अनेक गोष्टी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, भविष्यात त्यामुळे बरेच नुकसान होऊ शकते. तुम्ही तुमच्या कारमध्ये सीएनजी किट घेण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

सर्व सीएनजी किट अस्सल नसतात
आजकाल प्रत्येक गोष्टीची खोटी कॉपी बाजारात सहज उपलब्ध असते. सीएनजी किटचेही असेच होते. बाजारात उपलब्ध असलेले प्रत्येक सीएनजी किट अस्सल असतेच असे नाही. तुमच्या कारमध्ये सीएनजी किट बसवण्यापूर्वी त्याची सत्यता तपासणे महत्त्वाचे आहे. यासाठी नेहमी अधिकृत डीलरकडूनच खरेदी करा.

अनधिकृत डीलरकडून किट बसवून घेऊ नका
काही वाहन मालक स्थानिक डीलर्स आणि कर्मचारी यांच्याकडून त्यांच्या वाहनांमध्ये किट बसवून घेतात. तथापि, खराब दर्जा आणि चुकीच्या फिटिंगमुळे गॅस गळती होण्याची शक्यता असते, ज्यामुळे आग लागण्यासारखे अपघात घडतात.

किट वाहनास सुसंगत असल्याची खात्री करून घ्या
कारमध्ये सीएनजी किट बसवण्यापूर्वी वाहन किटला सपोर्ट करेल की नाही हे जाणून घ्यायला हवे. अनेकदा आपण जुन्या गाडीत सीएनजी किट बसवून घेतो, परंतु, नंतर कारमध्ये अनेक समस्या यायला लागतात.

इंजिनवरील वॉरंटी
शोरूमव्यतिरिक्त बाहेर जाऊन जर आपण सीएनजी किट बसवून घेतली तर कारच्या इंजिनवरील वॉरंटी संपते. यामुळे ग्राहकाचे मोठे नुकसान होऊ शकते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago